शिवसेना काेणाची यावरून सर्वाेच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची लढाई सुरू आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाची संपूर्ण राज्याला प्रतीक्षा आहे. परंतु या ना त्या कारणामुळे ही लढाई लांबणीवर पडत आहे. दरम्यान बुधवारी सकाळी पुन्हा सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. परंतु पुन्हा एकदा ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर आहे. आता २७ सप्टेंबरला यावर न्यायालयात सुनावणी हाेणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुनावणीसाठी. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश एम. आर. शहा, न्यायाधीश कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हीमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन करण्यात आलं आहे. बुधवारच्या सुनावणीमध्ये सर्वाेच्च न्यायालयाची भूमिका स्पष्ट हाेईल असे सर्वांनाच वाटत हाेते. परंतु आम्ही २७ सप्टेंबरपर्यंत या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ता संघर्षाचा पेच आणखी २० दिवस म्हणजे २७ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे आता २७ सप्टेंबरलाच निवडणूक आयाेगाबद्दलचे सर्व युक्तीवाद ऐकल्या जाऊन त्यावर सविस्तर सुनावणी हाेईल असं म्हटल्या जात आहे.
सत्तासंघर्ष सुरू झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच घटनापीठापुढे सुनावणी झाली. शिंदेगटाकडून वकील नीरज काैल यांनी बाजू मांडली. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गाेठवण्यात यावं अशी मागणी करतानाच आमदार असो, वा नसो, पक्षावर दावा करुच शकतो असं वकील कौल यांनी यावेळी सांगितलं. त्याचबराेबर निवडणुका लक्षात घेऊन लवकर निर्णय घ्यावा असं शिंदेगटाकडून सांगण्यात आलं.
हे ही वाचा:
सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा
कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी
तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले
उद्धव ठाकरे संजय राऊत यांना तुरुंगात भेटणार होते पण
मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील देऊन २७ जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे द्यायचे होते. बुधवारच्या सुनावणीच्यावेळी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ उद्या या प्रकरणावर काय सुनावणी देणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून हाेते. सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत लांबल्यामुळे मंत्रिमंडळाच्या ऊर्वरित विस्ताराचीही प्रतीक्षा वाढली आहे.