शिवसेना उद्धव गटाच्या नाशिकमधील जवळपास ५० तर परभणीत महाविकासआघाडीतील ३० नगरसेवक शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले आहेत.शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पण त्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का देत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नाशिक बालेकिल्याला भगदाड पडले आहे. ठाकरे गट आणि महविकासआघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नाशिक बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळू लागले आहेत. या आधीसुद्धा राऊतांची पाठ फिरताच १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. गेल्या पंधरा दिवसांमध्ये नाशिक संपर्क प्रमुख, माजी आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. गळती थांबवून पक्षाला सावरण्यासाठी म्हणून संजय राऊत नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. पण यावेळी त्यांनी नाशिकचा उंबरठा ओलांडण्याच्या आधीच शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले आहेत. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे म्हटल्या जात आहे. उद्धव ठाकरेंनी या महिना अखेरीस सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र त्याआधीच पुन्हा एकदा पक्षाला भगदाड पडले आहे. पन्नासहून जास्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
#नाशिक जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आज #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/JvUzUOx04a
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 6, 2023
हे ही वाचा:
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
खिलाडी अक्षय कुमारने योगी आदिनाथांना दिले रामसेतु पाहण्याचे निमंत्रण
अजित पवार यांची वैचारिक उंची कळली
श्रीनगरमधील अहमद अहंगर दहशतवादी घोषित
परभणीत मविआतील ३० नगरसेवक शिंदे गटात
परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अशा एकूण ३० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.