राज्यातील शिक्षक पदवीधर मतदार संघासाठी सोमवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील नाशिक आणि अमरावती यासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या पाच शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होत आहे. नाशिकचे आमदार सत्यजित तांबे यांच्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे २ फेब्रुवारीला कळू शकणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे. विधान परिषदेच्या २ पदवीधर व ३ शिक्षक अशा एकूण ५ मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे.
सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. भाजपने तांबे यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना कमाला लागण्याचे आदेश दिले आहेत. परंतु भाजपने तांबे यांना अद्याप पाठिंबा जाहीर केलेला नाही. तांबे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील निवडणूक लढवत आहेत. या लढतीकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे आहे हे ब्रह्मास्त्र !
शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी
अर्थसंकल्पात या गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत
ठाकरे गट हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे?
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागात २६२ अमरावती जिल्ह्यात ७५ तर औरंगाबाद जिल्ह्यात ५३ तर, मराठवाड्यात २२७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी धुळे जिल्ह्यात एकूण२९ केंद्र आहेत अमरावती विभागातील २ लाख ६ हजार १७७पदवीधर मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील. मराठवाड्यात ६१ हजार मतदार मतदान करणार आहेत.
अशा होतील लढती :
नाशिक : अपक्ष सत्यजित तांबे, भाजप बंडखोर आणि ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील (धुळे) यांच्यात चुरस आहे. वंचितचे रतन बनसोडे रिंगणात .
नागपुर : भाजपचे ना. गो. गाणार व विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर आडबोले नागपुरात एकूण २२ जण रिंगणात . नागपूरमध्ये चौरंगी लढत, शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात.
अमरावती : अमरावतीमध्ये भाजपचे डाॅ.रणजित पाटील, काँग्रेसचे धीरज लिंगाडे व वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकर यांच्यात तिरंगी लढत. एकूण २३ उमदेवार रिंगणात .
कोकण : भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे , मविआ पुरस्कृत अपक्ष उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्यात दुहेरी लढत . जदयूचे धनाजी पाटील यांच्यासह एकूण ८ उमेदवार रिंगणात .
औरंगाबाद : महाविकास आघाडीकडून विक्रम काळे , भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रदीप साळुंखे अशी तिरंगी लढत. मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.