32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरक्राईमनामापत्रकाराच्या खुनामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत?

पत्रकाराच्या खुनामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत?

Google News Follow

Related

नगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचा सहा एप्रिल रोजी खून झाला. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोघं जणांना अटक केली आहे. पण सहनिवारी या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. पत्रकार दात्री यांची हत्या एका भूखंडाशी निगडित प्रकरणामुळे झाली आणि हा भूखंड महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांशी संबंधित असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केला आहे.

राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार असणारे रोहिदास दातीर यांची सहा एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात स्थानिक पोलीस तपास करत असून आत्तापर्यंत दोघं जणांना अटक केली आहे. पण आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी शनिवारी पोलीस अधीक्षकांची भेटब घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत, पॅकेजबद्दल मात्र मौन

ठाकरे सरकारचा पर्दाफाश… लसीच्या तुटवड्याच्या दावा खोटा

जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात

कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये टाका – भाजपा

कर्डीलेंचा गौप्यस्फोट
पत्रकारांशी बोलताना कर्डीले म्हणाले की त्यांनी या घटनेची बारकाईने माहिती घेतली आहे. राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीविषयी दातीर सतत तक्रार अर्ज दाखल करत होते. यामुळे अडचणी वाढत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली असा कबुली जबाब अटकेत असलेल्या आरोपींनी दिला आहे. हा भूखंड आधी पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावे होता. पण नगरपालिकेने या भूखंडावर आरक्षण टाकले. नंतर हे आरक्षण उठवण्यात आले. सध्या ह्या जागेवर सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्राचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून, सोहम हे त्यांच्या चिरंजिवांचे नाव आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे आणि तनपुरे यांचे मेहुणे देशमुख हे या कंपनीत भागीदार आहेत. पठारे कुटुंबीयांनी पत्रकार दातीर यांना मुख्तियारपत्र दिले होते. त्यामुळे दातीर हे या जमिनीसाठी कायदेशीर लढाई लढत होते असे कर्डीले यांनी सांगितले. दातीर यांना या प्रकरणात अनेकदा धमकीही आली असून त्यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पण पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले नाही, ना आरोपींवर कारवाई केली असा आरोप कर्डीले यांनी केला आहे.

अहमदनगर येथील स्थानिक माध्यमांनी या संबंधीचे वार्तांकन केले असून, या प्रकरणामुळे ठाकरे सरकारचा आणखीन एक मंत्री अडचणीत येणार का? याची चर्चा रंगली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा