रा.स्व.संघाच्या गणवेशाने माविआ मंत्र्यांना कळा

रा.स्व.संघाच्या गणवेशाने माविआ मंत्र्यांना कळा

कोरोना महामारीत नागरिकांची मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी गणवेश घालून मदत केल्याने ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना कळ लागली आहे. सामाजिक संस्थानी कोरोनाकार्यात मदत करणे चांगले आहे, पण कोणत्याही संस्थेने आपल्या विशिष्ट गणवेशात मदत करायला येऊ नये असे महाराष्ट्राचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. हे विधान करताना त्यांनी कोणत्याही संस्थेचे नाव घेतले नसले तरीही त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे होता.

साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सामाजिक कार्य करताना विशिष्ट गणवेशात ते करू नये असे विधान केले आहे. शुक्रवार, १४ मे रोजी साताऱ्याच्या कऱ्हाड येथील जिल्हा उपरुग्णालयात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता राष्ट्रीय सवयंसेवक संघावर निशाणा साधला. संघाचे स्वयंसेवक कऱ्हाड येथील उपरुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची मदत करत होते. प्रशासनाच्या परवानगीने हे मदतकार्य संघातर्फे सुरु होते. या मदतकार्यासाठी युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संघावर आरोपही केले होते. यासगळ्या प्रकारानंतरच मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रा.स्व.संघाने गणवेशात मदतकार्य करू नये असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचे दीड हजार रुपये अजून लोक शोधत आहेत

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

या संबंधी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. सामाजिक संस्थानी मदतकार्य करायला हरकत नाही. पण कुठल्याही प्रकारच्या गणवेशात येऊन मदतकार्य करायची गरज नाही. परवा जो प्रकार घडला तो चुकीचा होता. पोलिसांनी, डॉक्टरांनी गणवेश घातला पाहिजे ते योग्य आहे. पण सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना गणवेशाची गरज नाही असे पाटील यांनी म्हटले आहे.

Exit mobile version