तीन पक्षांचे सरकार असले तरी आमचे सुरळीत सुरू आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी सांगत होते. परंतु पडद्याआड मात्र नाराजीचे सूर उमटत होतेच. आता तर उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विश्वासात न घेता आमदार अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवून दिल्याचा आरोप मित्र पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत महाविकास आघाडीतील फूट स्पष्ट झाली आहे. आघाडीची गाठ सुटली आणि तिन्ही पक्षांकडे अविश्वासाची दोरी आली अशी झालेली परिस्थिती आता दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण तशी चर्चा आमच्यात झाली नाही. मविआमध्ये फुटीचे संकेत देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी कधीच बांधली नाही.ही नैसर्गिक आघाडी नव्हती. विपरित परिस्थितीत उभी राहिलेली असल्याचा हल्लाबोल केला आहे. दानवे यांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे बघायला मिळत आहे. मित्रपक्षच आता असे विधान करू लागल्याने तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी काहीच उरलेले नाही असेच संकेत यातून मिळत आहेत.
राजन साळवींचा प्रयोग फसला
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना युती सत्तेवर आल्यानंतर घटनाक्रम झपाट्याने बदलला. महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी विधानपरिषद सभापतीपदासाठी शिवसेनेला उमेदवारी दिली होती. त्यासाठी उद्धव ठाकरे गटाने राजन साळवी यांना रिंगणात उतरवले, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. युती सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.
ही वाचा:
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!
राष्ट्रवादीने बदलले डावपेच
उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ १५ आमदार उरले आहेत, तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आमदार आहेत हे यावरून स्पष्ट झाले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेची उमेदवारी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही शिवसेनेला उमेदवारी दिली होती. तत्परतेने डावपेच बदलले आणि अजित पवारांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून पुढे केले. अजित पवार विरोधी पक्षनेते झाले.
शिवसेनेची घड्याळाची चाल
उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाप्रमाणे वेगाने धावत संभाजी नगरचे विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले. शिवसेनेच्या आमदार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी तत्काळ शिवसेनेचा प्रस्ताव मान्य केला आणि अंबादास दानवे विरोधी पक्षनेते झाले.