महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील या पैलवानाने इतिहास रचला. तब्बल २१ वर्षानंतर त्याने कोल्हापूरला हा मानाचा पुरस्कार मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी राज्यभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पृथ्वीराजचे कौतुक केले आहे.
पृथ्वीराज पाटीलच्या कामगिरीसाठी भारतीय जनता पार्टी कडून त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. भाजपा मार्फत त्याचा जाहीर सत्कार करण्याची घोषणाही पक्षामार्फत फडणवीस यांनी केली आहे. तर पृथ्वीराजला पाच लाखांचा विशेष पुरस्कार देणार असल्याचेही भाजपाने घोषित केले आहे. ऋतुराज पाटीलच्या पुढील सरावासाठी हीरक्कम त्याला उपयोगी पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, १० एप्रिल रोजी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हेदेखील उपस्थित होते
हे ही वाचा:
पोलिसांना चुकविण्यासाठी गो तस्करांनी गाईंनाच गाडीतून फेकले
‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’
पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा
पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल
ऋतुराज पाटीलचा आयोजकांवर गंभीर आरोप
दरम्यान ऋतुराज पाटील याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली असली तरीदेखील स्पर्धेच्या आयोजकांवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्या नंतर आयोजकांनी आपल्याला फक्त मानाची गदाच दिल्याचे त्याने म्हटले आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम दिली नसल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे आता या स्पर्धेला एका नव्या वादाची किनार लाभण्याची चिन्हे आहेत.