फडणवीसांवर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे संकेत

फडणवीसांवर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे संकेत

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असे म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरु असताना फडणवीसांचे तिथे जाणे त्यांना अडचणीचे ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी रात्री घडलेल्या प्रकारची माहिती दिली. पोलीसांना अशी माहिती मिळाली होती की साठ हजार रेमडेसिवीरचा साठा महाराष्ट्रात येणार आहे. यावेळी पोलीसांना माहित नव्हते की पुरवठादाराकडे या इंजेक्शनचा पुरवठा करण्याची परवानगी आहे. त्यामुळे पोलीसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. परवानगीचे पत्र सुरवातीला त्याने पोलीसांना दाखवले नाही असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग

रडत बाजीराव आणि चाय-बिस्कुटी प्रचार

रेमडेसिवीर पुरवठादारांना ठाकरे सरकारचाच त्रास! आधी धमकी, मग पोलीसांनी उचलले

अरे मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात

यावेळी बोलतानाच दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की ही चौकशी सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर तिथे पोहोचले. त्यांनी पोलीसांवर दबाव टाकला. हा एक प्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप होता. त्यांच्या येण्याने चौकशीत बाधा आली असे म्हणताना हे घडला प्रकार चुकीचा असून पुढील काळात हे सहन केले जाणार नाही असे पाटील यांनी सांगितले.

फडणवीस आणि दरेकरांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता या विषयी माझ्या सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेण्यात येईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच ब्रुक फार्मा ही कंपनी नक्की कोणाला रेमडेसिवीरचा साठा पुरवणार होती याचीही चौकशी होकाशी होईल असे दिलीप वळसे पाटील याणी सांगितले.

Exit mobile version