शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची बातमी खरी असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेताना या संदर्भातली माहिती दिली आणि तेलतुंबडे या चकमकीत ठार झाल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे देशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांपैकी एक मिलिंद तेलतुंबडे याला कंठस्नान घालायची यशस्वी कामगिरी गडचिरोली पोलिसांनी करून दाखवली आहे.
गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाला जिल्ह्यात शनिवारी मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे. या चकमकीत कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा देखील ठार झाल्याची बातमी समोर येत होती. पण या बातमीची पुष्टी होत नव्हती.
हे ही वाचा:
… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन
निलंबनाच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू
पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
पण आता थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनीच मिलिंद तेलतुंबडे हा या कारवाईत मारला गेला असल्याचे जाहीर केले आहे. एकूण २६ नक्षलवादी मारले गेले असून यामध्ये २० पुरुष आणि ६ महिला आहेत. या चकमकीत माओवादी संघटनेचा राष्ट्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे हा देखील ठार झाला असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
मूळचा वणी येथील रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे हा भारतातील वॉन्टेड नक्षलवाद्यांपैकी एक होता. लेखक, प्राध्यापक असलेले आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद हा लहान भाऊ. गेली अनेक वर्ष तो भाकपा माओवादी या बंदी असलेल्या संघटनेचा सभासद असून महाराष्ट्राचा सचिव म्हणून तो कामकाज पाहत होता. त्याच्यावर तब्बल ५० लाख रुपयांचे इनाम होते.