महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या गृह खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील पोलिसांच्या बदली आणि पदोन्नतीच्या आदेशाला गृहविभागाने अवघ्या चोवीस तासांत स्थगिती दिल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा गृहविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
बुधवार, २० एप्रिल रोजी ठाकरे सरकारमार्फत राज्यातील काही पोलिसांच्या बदलीचे आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आला होता. पण सरकारच्या या निर्णयाला २४ तास उलटण्याच्या आधीच या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. गुरुवार, २१ एप्रिल रोजी सरकारमार्फत ही स्थगिती देण्यात आली. पण असे असले तरी या यादीतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र कायम ठेवण्यात आल्या असून त्याला स्थगिती दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. पदोन्नतीला स्थगिती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे या परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये राजेंद्र माने, महेश पाटील, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे आणि संजय जाधव या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!
…म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी
दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
दरम्यान या बदलीचा आणि पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली असताना त्याबाबत कोणतेही ठोस कारण पुढे येताना दिसत नाही. पण असे असले तरी देखील आता या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार विरोधात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. गृह विभागातील बदली आणि पदोन्नतीच्या संदर्भात कोट्यावधी रुपयाची लाच मागितल्याचे आरोप आधीच झाले आहेत. त्यामुळे बदली आणि पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती देणे मागे घेण्याचे तेच कारण आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.