गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राचे शेजारील राज्य कर्नाटक याच्याशी सुरू असलेल्या वादासोबतच महाराष्ट्र गुजरात सीमावाद देखील सुरू होता. मात्र, आता महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चितीला प्रारंभ झाला असून सीमा भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. दोन दिवस मोजणी झाली असून त्यामुळे आता महाराष्ट्र गुजरात सीमा वाद मिटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र गुजरात सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत आहे. या गावालगतच गुजरातमधील बलसाड जिल्ह्यामधील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंभा ग्रामपंचायत आहे. कोरोना माहामारीच्या काळात गुजरात प्रशासनाने सीमा भागातील रस्ते बंद केले. यामध्ये उंबरगाव रेल्वे स्थानकाहून तलासरीकडे जाणारा जिल्हा मार्ग वेवजी येथे बंद करण्यात आला. त्यामुळे बोर्डी आणि तलासरीकडे जाण्यासाठी स्थानिकांना गैरसोय झाली. वेवजी गावातील लोक हे उंबरगाव बाजारपेठेतून जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. तसेच गुजरात प्रशासनाने बंद केलेला भाग महाराष्ट्राच्या हद्दीत असून गेल्या काही वर्षात वेवजी गावाच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा:
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
काँग्रेसला धक्का देत शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल
गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!
पंतप्रधान मोदी म्हणतात की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत!
त्यानंतर ग्रामस्थ अशोक धोडी यांनी गावाचा नकाशा अद्दी कागदांची दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून जमवली. त्यानंतर वेवजी ग्रामपंचायत, तलासरी तहसीलदार आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे गुजरात राज्याने वेवजी गावाची जमीन हडपल्याची तक्रार केली. जिल्हा प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेत ३ मार्च आणि ४ मार्च रोजी सीमा निश्चितीसाठी भू अभिलेख, सार्वजनिक बांधकाम महसूल विभाग, वेवजी ग्रामपंचायतीला आदेश दिले. त्यामुळे हा सीमावाद संपणार असल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला.