महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण करू नये

महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण करू नये

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र सरकारने लसीकरणाचे राजकारण करू नये असे जावडेकरांनी म्हटले आहे. या सोबतच केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या लसींची आकडेवारी देत महाराष्ट्र सरकारच्या दाव्यांना खोडून काढले आहे.

महाराष्ट्रात सध्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे आणि पुढल्या तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा महाराष्ट्रात सध्या आहे असा खळबळजनक दावा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. सध्या लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगून लसीकरण वाढवण्यासाठी लस पुरवली गेली तर महत्त्वाचा प्रश्न सुटेल असेही ते म्हणाले. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

हे ही वाचा:

लसीच्या तुटवड्याचा ठाकरे सरकारचा दावा धादांत असत्य

…अन्यथा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्य्स्फोट

अजित पवारांवरही सचिन वाझेकडून आरोपांच्या फैरी

पण राजेश टोपे यांनी लसीकरणासाठी केंद्राकडे बोट दाखवल्या नंतर केंद्र सरकारने त्यांच्या दाव्यातील असत्यता लोकांसमोर आणली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी एका पत्राद्वारे ठाकरे सरकारच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारला उघडे पाडले.

काय म्हणाले जावडेकर?
“महाराष्ट्र सरकारने लसींवरून राजकारण करू नये. महाराष्ट्राला आत्तापर्यंत १,०६,१९,१९० इतक्या लसींचा पुरवठा झाला आहे. यापैकी ९०,५३,५२३ इतक्या लसी वापरल्या गेल्या आहेत. (पैकी ६% म्हणजेच तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त लसी या वाया गेल्या आहेत) तर ७,४३,२८० लसी या येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला उपलब्ध लसींचा साठा हा २३ लाखांच्या आसपास आहे”. अशी आकडेवारी मांडत जावडेकरांनी ठाकरे सरकारच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे.

Exit mobile version