23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणजी पद्धत स्वीकारायच्ये ती स्वीकारा, पण तातडीने मदत जाहीर करा!

जी पद्धत स्वीकारायच्ये ती स्वीकारा, पण तातडीने मदत जाहीर करा!

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. गुरुवार, २८ जुलै रोजी त्यांनी सांगली जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तर त्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना झाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी सकाळपासूनच सांगलीतील नुकसानग्रस्त भागांना भेटी द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाळवा, मिरज, पलूस, भिलवडी, जामवाडी अशा विविध भागांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पिडीत नागरिकांची चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. या पाहणीच्यावेळी खासदार संजयकाका पाटील, सदाभाऊ खोत, पृथ्वीराजबाबा देशमुख हे सारेच उपस्थित होते.

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकारकडून अजून कोणत्याही प्रकारच्या मदतीची घोषणा झालेली नाही. यावरूनच त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. लवकरात लवकर मदतीची घोषणा सरकारकडून झाली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. झालेल्या नुकसानीचा विचार करता सरसकट नुकसान गृहीत धरावे लागेल. त्यामुळे सर्वांना मदत मिळणे शक्य होते असे फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारला जी पद्धत स्विकारायची असेल ती स्विकारावी पण तातडीने पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

हे ही वाचा:

शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

‘तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री’…कोकणवासी कडाडले

रंगकर्मीं का रागावले आहेत? जाणून घ्या कारणे…

२०१९ मध्ये पुराच्या वेळी आपल्या सरकारने विशेष असे निर्णय घेतले. त्यामुळे शेती, जनावर यांना मदत मिळाली आणि दुकानदारांना सुद्धा पैसे मिळाले असे फडणवीस यांनी सांगितले. २०१९ मध्ये लोकांना रोखीची मदत देण्यात आली. नवीन घर देण्यात आलेच, पण तात्पुरत्या स्वरूपात दुसर्‍या घरात रहावे लागले तेव्हा घर भाड्याचे पैसेसुद्धा सरकारने दिले याची आठवण फडणवीसांनी करून दिली. एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळतच असते. पण राज्य सरकारने अशा वेळी निकषांच्या बाहेर जाऊन ठोस मदत करायची असते असे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या पुराच्या वेळी पंचनामे झाले नाहीत तर मोबाईलने काढलेला फोटो हा पुरावा मानावा असा निर्णय फडणवीस यांच्या सरकारने घेतला होता. आताही तसाच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

आज सांगली दौऱ्यावर असताना फडणवीस आणि दरेकर यांनी दिवंगत संभाजी पवार यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आज सांगली दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. तर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

सांगलीतील हा दौरा आटोपून ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे श्री पद्मराजे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे भाजपा आणि भाजयुमो, तसेच कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यामार्फत सुरु असलेल्या मदतसामुग्रीचे त्यांनी वितरण केले तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा