खारफुटीच्या कत्तलीवर तथाकथित पर्यावरणप्रेमींचे मौन

खारफुटीच्या कत्तलीवर तथाकथित पर्यावरणप्रेमींचे मौन

महाराष्ट्राच्या महसूल विभागाने आणि वन विभागाने ऐरोली ब्रिज ते ठाणे-बेलापूर मार्गादरम्यान असलेल्या खारफुटीच्या जंगलाची उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी कत्तल करण्याची परवानगी दिली आहे.

ऐरोली ब्रिज ते ठाणे-बेलापूर उड्डाणपुल हा प्रस्तावित ऐरोली ते कटाई नाका मुक्त महामार्गाचा भाग असणार आहे. या उड्डापुलासाठी सुमारे एक हेक्टर खारफुटी वन तोडण्याची परवानगी राज्याच्या वन विभागाने दिली आहे. यात सुमारे ०.९८३ हेक्टर जमिनीवरील खारफुटी जंगल तोडण्याची परवानगी जंगल (संरक्षण) कायदा, १९८० च्या तहत देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात

आपल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट?

या महामार्गावरील १.६८ किमी लांबीचे दोन बोगदे ठाणे- बेलापूर उन्नत मार्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. कल्याण आणि बदलापूर भागातील रहिवाशांना मुंबईला येताना सातत्याने प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. या मुक्त मार्गामुळे हे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार आहे. या मुक्त महामार्गाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाकडूनही हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. मात्र पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरणमंत्रालयाकडे हा प्रकल्प अडकला होता. ठाणे महानगरपालिकेच्या २०२२ मधील निवडणुका ठरलेल्या असताना १२ मार्च रोजी मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

नेटिझन्सकडून सवाल

मुंबई मेट्रो ३ कारशेड आरे येथे बनविण्यावरून प्रचंड गदारोळ करणारे पर्यावरप्रेमी आता गप्प का असा सवाल नेटिझन्सकडून केला जात आहे. अभिनेता सुमित राघवन याने यावरून तथाकथित पर्यावरणप्रेमींवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकी आधी आरे कॉलनीतील कारशेडचा मुद्दा राजकीय विषय झाला होता. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने हा जंगलाचा भाग असून कारशेडमुळे या भागातील पर्यावरणाला हानी पोहोचेल असे सांगत या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

Exit mobile version