विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. तर शिवसेना शासित मुंबई महापालिकेच्या कारभारावरही त्यांनी निशाणा साधला आहे. ‘घोषणा सम्राट सरकारमुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाला आहे’ अशी जहाल टीका दरेकर यांनी केली आहे.
गुरुवार, २ जून रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच तोफ डागली आहे. ट्विटरच्या माध्यमातून लसीकरणाचा मुद्दा उचलत दरेकर यांनी सरकारची पिसे काढली आहेत. दरेकर आपल्या ट्विटमध्ये असे म्हणतात. “ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरला. दीड महिन्यापूर्वी परवानगी देऊनही महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिका लस खरेदी करू शकली नाही. केंद्र सरकारने सर्व लसी मोफत पुरवल्या. घोषणा सम्राट सरकारने नियोजन न करता मोफत लसीकरणाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाला.” असे टीकास्त्र दरेकर यांनी डागले आहे.
•ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरला!
•दीड महिन्यापूर्वी परवानगी देऊनही @CMOMaharashtra व @mybmc लस खरेदी करू शकली नाही.
•केंद्र सरकारने सर्व लसी मोफत पुरवल्या.
•घोषणा सम्राट सरकारने नियोजन न करता मोफत लसीकरणाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाला.— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 2, 2021
हे ही वाचा:
परदेशी लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा
बारा आमदारांचे प्रकरण विचाराधीन, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कोविड लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू असलेला दिसत आहे. महाराष्ट्र सरकारला जागतिक निविदा काढण्याची परवानगी दिली असूनही सरकारने निविदा काढलेली नाही. उलट हा विषयही केंद्रावरच ढकलण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेने जागतिक निविदा काढली असली तरीही त्याला म्हणावा तास प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. उलट यातही घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जात आहे. लसीची कमतरता असल्याचे कारण पुढे करत सरकारने सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवरचे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तरीही काही प्रसिद्ध व्यक्तींना नियमबाह्य लसीकरण केले जात असल्याची प्रकरणे समोर येताना दिसत आहेत.