महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार हे हिंदूद्रोह्यांचे सरकार आहे. असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढलेल्या जंगी मिरवणूकी वरून भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचा रविवार ८ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. त्यांच्या या वाढदिवसाचे सेलिब्रेशन फारच जंगी स्वरूपाचे झाले. एकीकडे राज्यात कोरोना प्रतिबंधक नियमावली लागू असताना आझमी यांच्या वाढदिवशी मात्र हे सारे नियम धाब्यावर बसवले गेले. हजारो लोकांची गर्दी जमवत अबू आझमी यांनी वाढदिवसाची मिरवणूक काढली. तर स्वतः घोडा गाडीत बसून नंगी तलवार नाचवली. हे सारे घडत असताना पोलीस तिथे उभे होते पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
हे ही वाचा:
लक्ष विमान प्रवाशांची संख्या झेपावण्याकडे
‘न्यूज डंका’च्या पत्रकारांनी दिला आपदग्रस्तांना मदतीचा हात
सावधान ! डासांचे आक्रमण सुरू झाले आहे
त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘अबू आझमी यांच्यासाठी नियमावली वेगळी आहे का?’ ‘सरकारचे नियम त्यांना लागू होत नाहीत का?’ असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी या प्रकरणी आक्रमक झाली असून आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘अबू आझमीसारख्या मुजोर, बेशरम आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आमदारावर उद्धव ठाकरे कारवाई करणार का?’ असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. ठाकरेंचे बेशरम सरकार हिंदू सणांवर निर्बंध लावणार. उद्यापासून श्रावण सुरू होतो आहे, पण मंदिरे मात्र अजूनही बंद आहेत. हे हिंदूद्रोह्यांचे सरकार आहे असा हल्ला भातखळकर यांनी चढवला आहे.