28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरराजकारणपीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ

पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ

ऑनलाईन फॉर्म भरताना अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे मुदतवाढीचा मागणी होत होती.

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. ३१ जुलै ही विम्यासाठी हफ्ता भरण्याची शेवटची तारीख होती. आता बळीराजाला ३ ऑगस्टपर्यंत पिक विमा हफ्ता भरता येणार आहे. दरम्यान, पीक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे मुदतवाढीचा मागणी होत होती.

 

सध्या केवळ १ रुपयांमध्ये पीक विमा उतरवण्याची योजना शासनाने आणली आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येते. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. शासनाची वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांना विमा हफ्ता भरण्यासाठी अडचणी होत्या. एकीकडे विमा हफ्ता भरण्यासाठी गर्दी आणि दुसरीकडे वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकरी वैतागले होते. शेवटची मुदत ३१ जुलै असल्याने आणि अनेक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता भरणे बाकी असल्याने शेतकरी पीक विम्याच्या सवलतीतून बाद होणार का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती.

हे ही वाचा:

लवकरच चंद्र करणार चांद्रयानाचे स्वागत; चंद्राच्या कक्षेपासून फक्त सहा दिवस दूर

पुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त

दगडूशेठ गणपती दर्शन, लोकमान्य टिळक पुरस्कार, मेट्रो उद्घाटन… मंगळवारी पंतप्रधान पुण्यात

थ्रेड्सने निम्म्याहून अधिक वापरकर्ते गमावले, झुकरबर्गना धक्का

पीक विमा भरण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून ३ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा