ठाकरे सरकारच्या काळात सुरवातीपासूनच दारू निर्माते आणि विक्रेते यांना साजेसे निर्णय घेण्याचे धोरण दिसून आले आहे. त्याचाच नवा अध्याय आज बघायला मिळाला आहे. गुरुवार, २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता महाराष्ट्रातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करायला परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला आहे. फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांना यातून चालना मिळेल असा दावा सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला असल्याचे ठाकरे सरकारचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
काल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण
‘मंत्रालयात माझा फोटो काढणारा उद्धव ठाकरेंचा निकटवर्ती?’
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन
कर्जतच्या जमिनीशी उद्धव ठाकरे यांचा संबंध सोमय्या करणार उघड…
राज्यातील मोठ्या सुपर मार्केट्सना आणि किराणा दुकानांना वाईन विक्रीसाठी सरकारकडून परवानगी देण्यात येणार आहे. या मध्ये १००० स्क्वेअर फुटपेक्षा मोठ्या जागेतील दुकानांना ही परवानगी देण्यात येणार आहे. पंत्यापेक्षा कमी जागेतील दुकानांना मात्र अशा प्रकारची परवानगी देण्यात आली नाहीये. मोठ्या दुकानांमध्ये १०० स्क्वेअर फुटाच्या जागेत एक नवीन सेक्शन सुरु करून तेथे ही वाईन विक्री करता येऊ शकते.
सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे बेवड्यांना समर्पित असल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचे काम हे सरकार करत आहे असे देखील मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.