ठाकरे सरकार विरोधात शेतकऱ्यांचा अन्नत्याग

ठाकरे सरकार विरोधात शेतकऱ्यांचा अन्नत्याग

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेचे राजकीय भांडवल करत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने सोमवार, ११ ऑकटोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिलेली असतानाच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ७२ तसंच अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. लातूर येथे भाजपा नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची घोषणा ठाकरे सरकारने केलेली नाही. त्यामुळे ठाकरे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रोश करताना दिसत आहेत. अशा या सर्व शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन छेडण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अमिताभ बच्चन यांनी पान मसाल्याची जाहिरात का नाकारली?

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

काय आहे मोदी सरकारने सुरु केलेली आयएसपीए?

‘काकांचं दुःख सतावत असल्यामुळेच बंदचा कांगावा’

लातूरचे माजी पालकमंत्री असणारे संभाजी पाटील निलेंगेकर यांच्या नेतृत्वात २७२ शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या आंदोलनात लातूर आणि आसपासच्या परिसरातील अनेक युवकांनी सहभाग नोंदवला आहे. लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाला सुरुवात करण्याआधी निलंगेकर आदिशक्ती गोलाई देवीच्या चरणी नतमस्तक झाले. तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार देखील अर्पण केला.

Exit mobile version