30 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारणराज्याचा महसूल गेला कुणीकडे?

राज्याचा महसूल गेला कुणीकडे?

Google News Follow

Related

राज्यामध्ये सध्याच्या घडीला वस्तू व सेवा करातून मिळणारा महसूल हा घटलेला आहे. मुख्य बाब म्हणजे जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ३,७२४ कोटींनी घट नोंदविण्यात आलेली आहे. याचबरोबरीने आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर, पहिल्या पाच महिन्यांत दस्त नोंदणीतही घट झालेली आहे. त्यामुळेच आता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला तूट सोसावी लागत आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल ३,६३४.६७ कोटींची तूट झालेली आहे. तसेच राज्याचा एकूण महसूल आटल्याने अजूनही राज्याची परिस्थिती नियंत्रणात नाही हे स्पष्ट होत आहे. निर्बंध शिथिल होऊनही राज्याचे अर्थचक्र अजूनही रुळावर आलेले नाही. त्यामुळेच ही चिंतेची बाब आहे. देशात सर्वाधिक वस्तू व सेवा कर संकलन महाराष्ट्रात होते. या पाठोपाठ गुजरात (७,५५६ कोटी), कर्नाटक (७,४२९ कोटी) आणि तमिळनाडू (७,०६० कोटी) या राज्यांमध्ये करसंकलन झाले. उत्तर प्रदेशात ५,९४६ कोटी करसंकलन झाले.

जुलैच्या तुलनेत गेल्या महिन्यात जीएसटीची वसुली चांगलीच रोडावली आहे. देशभरात

वस्तू व सेवा कराची (जीएसटी) सर्वाधिक वसुली ही महाराष्ट्रात होते. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये होणारी वसुली ३,७२४ कोटी रुपयांनी घटली. महाराष्ट्रातून ऑगस्टमध्ये केवळ १५,१७५ कोटी रुपये वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून संकलित झाले आहेत. गेल्या वर्षाच्या ऑगस्ट २०२०च्या तुलनेत ही वाढ ३१ टक्के अधिक आहे. असे असले तरी, गतवर्षी कोरोना पहिली लाट असल्यामुळे या काळात निर्बंध सर्वाधिक होते. यंदा मात्र निर्बंध कमी करूनही महसूलात झालेली घट ही विचार करायला लावणारी आहे. गेल्या वर्षी या काळात अनेक व्यवहार बंद होते. असे असले तरीही याच्या अगदी विरोधी म्हणजे यंदा जुलै महिन्यात राज्यात १८,८९९ कोटींचा महसुल जमा झाला होता. तसेच जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील करसंकलन हे मात्र ३,७२४ कोटींनी घटले आहे.

हे ही वाचा:

…म्हणून तरुणांना मद्यापासून परावृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री सरसावले!

थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना ‘बेस्ट’ बसेसचा ठेंगा

‘पांढऱ्या हत्तीं’वर अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडले ठाण

अरेरे! ‘त्या’ अंगरक्षकाने अखेर बोट गमावले

ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश निर्बंध शिथिल झालेले होते. असे असले तरीही, अर्थचक्र अद्याप रुळावर आलेले नाही ही खेदाचीच बाब आहे. सध्या आपल्या समोर असलेल्या आकडेवारीवरून तरी हेच चित्र दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा