कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह आपल्या हाती आल्याचे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केलं आहे. संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह ठेवून गेल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे असल्याचा दावा देशपांडे यांनी केला असून हे सगळे सोमवारी जाहीर करणार असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे,मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही आपण सादर करणार असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
वीरप्पन गॅंग चा करोना काळातला मोठा घोटाळा सोमवार दिनांक 23जानेवारी ला उघड करणार पुराव्या सहीत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2023
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी कडे तक्रार दाखल करणार
कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचा पेन ड्राईव्ह हाती लागल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. हे सगळं जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी आज दिला आहे. या पेन ड्राईव्हमध्ये बँक खात्यांचे पुरावे देखील मिळाले असल्याचं त्यांनी सांगितलं. कशा पद्धतीने मुंबईची लूट करण्यात आली हे आपण उघड करणार आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी कडे करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!
वीरप्पन गॅंगचा कोरोना काळात मोठा घोटाळा
संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे वीरप्पन गॅंगच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला संदिप देशपांडेंनी लगावला आहे.वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा पुराव्यासहीत सोमवारी म्हणजेच २३ जानेवारीला उघड करणार असल्याचे देशपांडेंनी म्हटलं आहे. त्यामुळं आता सोमवारी संदिप देशपांडे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. याशिवाय देशपांडे काय पुरावे सादर करणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे.