रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या चौकशीचे विशेष तपास पथकाला अर्थात एसआयटीला आदेश दिले आहेत. पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात पत्रकार वारीसे यांनी एक लेख लिहिला होता आंबेरकर चालवत असलेल्या गाडीने पत्रकार वारीसे हे खाली पडले होते. त्यानंतर त्यांना फरफटत नेऊन त्यांचा अपघात झाला नंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वारीसे यांचा मृत्यू झाला.
वारीसे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आंबेरकर हा या परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी साठी भूसंपादन करत असलेल्या विरोधात असणाऱ्या व्यक्तींना धमकावत असे. घडलेल्या घटनेच्या दिवशी राजापूर येथील पेट्रोल पंपाजवळ कोदवली गावात सकाळी वारीसे यांना हा अपघात झाला होता. त्यांनी आंबेरकरांविरुद्ध लिहिलेला लेख एका स्थानिक वृत्तपत्रात छापून आला होता. त्यानंतर वारीसे यांच्या मेव्हण्याने स्थानिक पोलीस स्थानकांत अपघात घडवून आणल्याची तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
विरोधी पक्ष आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी विशेष पथकाला संपूर्ण प्रकरणाचा तपस करून स्वतंत्र अहवाल मागितला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांवर असे जीवघेणे हल्ले होत असतील तर राज्य प्रशासन आणि पोलीस दलाचा पर्दाफाश करते असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी औरंगाबाद येथे काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वारिसे यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण सुद्धा तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन वारिसे यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. सरकारवर आरोप होत असताना उपमुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत विशेष पथक गठीत करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
संजय राऊत यांचे गृहखात्याला पत्र
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहखात्याला पत्र लिहून राऊत म्हणतात, शशिकांत वारिसे नाणार आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांकडून रिफायनरीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे जमिनीचे व्यवहार उघड करत आहेत या व्यवहारातील लीक नाराज होते हा अपघात नसून वारिसे यांचा खून झाला पोलिसांनी या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केलेली होती.