महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यभरात आज उत्सवाचे वातावरण आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठीत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीतून ट्विट केले आहे. “महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हिंदीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “राज्य स्थापना दिवसाच्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्र आणि देशाला आपल्या योगदानाने समृद्ध केले आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. मी राज्याच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो,” असे ट्विट रामनाथ कोविंद यांनी केले आहे.
राज्य स्थापना दिवस पर महाराष्ट्र के सभी लोगों को बधाई। छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले व बाबासाहब जैसी महान विभूतियों ने महाराष्ट्र व भारत को अपने योगदान से समृद्ध किया है। राष्ट्र के आर्थिक विकास में महाराष्ट्र का अहम योगदान है। मैं राज्य के उज्ज्वल भविष्य की कामना करता हूं।
— President of India (@rashtrapatibhvn) May 1, 2022
हे ही वाचा:
Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका
‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’
चेन्नईच्या संघाची धुरा पुन्हा धोनीकडे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मराठीत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “देशाला स्वराज्य, सुशासन, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचा संदेश देणाऱ्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या वीरभूमी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो,” असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
देशाला स्वराज्य, सुशासन, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचा संदेश देणाऱ्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या वीरभूमी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.
— Amit Shah (@AmitShah) May 1, 2022