महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने विरोधकांचा आवाज दाबायचा आपला सिलसिला सुरु ठेवला आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सोशल मीडिया सेलचे प्रभारी जितेन गजारिया यांच्या कार्यालयात सायबर पोलीस दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर ठाकरे सरकार विरोधात आक्रमकपणे लिहिल्यामुळेच गजारिया यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारल्याचे म्हटले जात आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार जितेन गजारिया यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या विरोधात सायबर तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे त्यांना बीकेसी येथील सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गजारिया यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सायबर विभागाचे पोलीस आज सकाळीच गजारिया यांच्या विद्यविहार येथील कार्यालयात दाखल झाल्याचीही माहिती मिळत आहे. तर बीकेसी येथील सायबर पोलीस ठाण्यात गजारिया यांना घेऊन जाण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाद
पंतप्रधानांचा ताफा अडवणारा ‘हात’ कोणाचा?
पोलिसांनीच सांगितला पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर विराजमान झाल्यापासून विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप कायमच केला जातो. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात समाज माध्यमांवरून ठाकरे सरकारच्या विरोधात लिखाण करणाऱ्या अनेकांवर सायबर पोलिसांच्या मार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. तर काही सामान्य नागरिकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या, तोंडाला काळे फासण्याचा घटनाही समोर आल्या होत्या. अशा विविध मार्गांचा अवलंब करून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप त्यांच्यावर कायमच होत आला आहे.