राहुल गांधीं विरोधातल्या याचिकेचे महाराष्ट्र कनेक्शन

राहुल गांधीं विरोधातल्या याचिकेचे महाराष्ट्र कनेक्शन

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बहुचर्चित अशा दिल्ली बलात्कार प्रकरणात ही याचिका करण्यात आली आहे. पण या याचिकेचे महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा आहे. कारण हे याचिकाकर्ते मुळचे महाराष्ट्रातील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे रहिवासी असलेले मकरंद म्हादलेकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात कोर्टाचे दार ठोठावले आहे.

दिल्ली येथील कॅण्ट परिसरात एका अल्पवयीन मुलीवर घडलेल्या बलात्कार आणि हत्त्या प्रकरणात राहुल गांधी यांनी ट्विट केले. पण यावेळी मुलीच्या आई वडिलांच्या सोबतचे फोटो राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केले. एका बलात्कार पीडितेची ओळख खुली करणारी ही घटना होती. यामुळे राहुल गांधी यांच्या असंवेदनशीलतेवर टीका तर झालीच. पण आता राहुल गांधींना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले

रंगकर्मींना खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले

कुठे सापडले पाहा सात कोटींचे अमली पदार्थ

अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?

पिडीतेच्या परिवाराला अतोनात अडचणी निर्माण केल्याबद्दल दापोलीयेथील रहिवासी असणाऱ्या मकरंद म्हादलेकर यांनी ऍड पंकज सिंग आणि ऍड गौतम यांच्या मार्फत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात पॉक्सो आणि जुवेनाईल जस्टीस ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

याचिका दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार आयोग, दिल्ली पोलीस आणि राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज नोटीस जारी करून त्यांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या पालकांचे फोटो ट्विट केल्यानंतर दलित पॉजिटीव्ह मुव्हमेंटचे रवी पी यांनी ट्विटरला नोटीस दिल्यांनतर, ट्विटरने राहुल गांधी यांचे ट्विट डिलीट केले होते आणि आता याच प्रकरणात मकरंद म्हादलेकर यांच्या खटल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version