आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच काँग्रेस पक्षातर्फे स्टंटबाजी करत केंद्र सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने हे आंदोलन केले.
केंद्र सरकारने अवाजवी कर लादत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत असा आरोप करत महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी सायकलवारी केली. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सगळे मंत्री आणि आमदार सायकलवरून विधिमंडळात दाखल झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आणि विधीमंडळापर्यंत सायकल चालवत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल चालवत विधानभवनात जाऊन मोदी सरकार चा निषेध केला. pic.twitter.com/mwkbE48imT
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 1, 2021
हे ही वाचा:
पेट्रोल वर महाराष्ट्र सरकारची २७ रुपये वसुली!
एकीकडे काँग्रेसपक्ष केंद्राकडे बोट दाखवून आंदोलन करत असला तरी महाराष्ट्रात ते सत्तेत आहेत. महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलवर कर रूपाने २७ रुपये कमावते असा पलटवार भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत सरकारवर ताशेरे ओढले होते. गेल्या वर्षी राज्य सरकारने व्हॅटच्या माध्यमातून २६,७९१ इतका नफा कमावला, पण केंद्राच्या नावाने उगाच शिमगा सुरु आहे अशी टीका भातखळकर यांनी केले आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेल इंधनावरील VAT कराद्वारे राज्यातील जनतेकडून २६,७९१ कोटी रुपयांचा देशातील पहिल्या क्रमांकाचा महसूल वसूल केला आहे… पेट्रोल व डिझेल दरवाढीसाठी मोदी सरकारच्या नावाने शिमगा करण्यापूर्वी राज्यातील जनतेला सरकारने ही वस्तूस्थिती सांगावी… pic.twitter.com/LYqIRpzh1o
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 26, 2021