देशात सध्या कोविडची दुसरी लाट आलेली आहे. पण याच वेळी महाराष्ट्रात मात्र त्सुनामी आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पण तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याचे गांभीर्य समजलेले दिसत नाही. गुरुवारी याचीच प्रचिती आली. पंतप्रधान मोदी यांनी कोविड संदर्भात बोलावलेल्या अत्यंत महत्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र टेलीफोन आणि मोबाईलवर बोलताना आढळून आले.
देशात सध्या कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोद्दी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ७०% आरटीपीसीआर चाचण्यांचे लक्ष्य ठेवले. बाधितांचा आकडा वाढला तरी चालेल पण चाचण्या वाढवा असे मोदींनी सांगितले. तसेच महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पंजाब अशा राज्यांनी पहिल्या लाटेतील रुग्णवाढीचा उच्चांक या लाटेत पार केल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली.
हे ही वाचा:
अँटिलिया समोर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्यात मनसुख हिरेन यांचा हात
…तर खांडेकर संपादक पदाचा राजीनामा देणार का?
हर हर महादेव! अयोध्येनंतर आता काशी विश्वेश्वराला मुक्ततेची आस
या बैठकीत एकीकडे इतक्या गंभीर विषयावर महत्वपूर्ण चर्चा होत असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र आपल्या फोनमध्ये व्यग्र झालेले आढळून आले. कधी लँडलाईन वर ते बोलताना आढळले तर कधी मोबाईलमध्ये लक्ष घातलेले दिसले. उद्धव ठाकरेंचे हे फोटो बघून नेटकऱ्यांमध्ये चीड दिसून आली. सोशल मीडियावर ठाकरेंच्या या फोटोवरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली. आज देशातले सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सरकार केंद्राकडे बोट दखवत जबाबदारीपासून पळ काढायला बघताय. राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांचा तुटवडा आहे आणि इतक्या बिकट परिस्थितीचे गांभीर्यही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाही अशी चर्चा पाहायला मिळाली.