‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले

‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले

काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’ असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वडेट्टीवार यांचा अप्रत्यक्षपणे रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्याकडे होता अशी कुजबुज सुरु झाली आहे.

रविवार, २७ जून रोजी नागपूर येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात महाराष्ट्राचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. या मेळाव्यात बोलताना वडेट्टीवारांनी राज्य सरकारमधील सहयोगी पक्ष शिवसेना आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच चिमटा काढल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय

मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही

संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला

रेल्वे टीसीने पकडलेला तरुण म्हणतो, जगायचं कसं?

नेमके काय घडले?
नागपूर येथे आयोजित ओबीसी समाजाच्या मेळाव्यात राज्याचे माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सहभागाची झाले होते. तेव्हा आपल्या भाषणात बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एक वाघ पाठवा असे बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर त्यानंतर बोलायला उभे राहिलेल्या वडेट्टीवार यांनी ‘वाघ आमच्याच इशाऱ्यावर चालतो’ असे विधान केले. त्यांच्या या वाक्याने सभागृहात एकच हशा पिकला.

सध्या रोज चव्हाट्यावर येत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मतभेदांमुळे वडेट्टीवार यांच्या या वाक्याचा थेट संबंध राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जोडला जात आहे. तर यादीही वडेट्टीवार यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. मी “विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं मिळालं. कारण मी ओबीसी आहे ना.” असे म्हणत वडेट्टीवार यांनी ठाकरे सरकारवर नेम धरला.

Exit mobile version