मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सर्व घटकांचा विचार केलेला नाही

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सर्व घटकांचा विचार केलेला नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन या शब्दाचा उच्चार न करता मागल्या दाराने लाॅकडाऊन लावला. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्यावर राज्यातून चौफे टीका होत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त करताना सरकारला खडे बोल सुनावले.

काय म्हणाले फडणवीस?
राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. असे केले तरच रूग्णांची परवड थांबेल असे मत फडणवीसांनी व्यक्त केले. तसेच कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा ठेऊ नये. तात्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी हा निधी वापरला गेला पाहिजे आणि तो पण तात्काळ विनियोग तत्त्वावर. त्यासाठीची आवश्यक ती परवानगी राज्य सरकारने द्यावी अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

पुढील पंधरा दिवस काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर

फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन

योगी आदित्यनाथ विलगीकरणात

तसेच घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण, बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना सरकारने आणलेली नाही. हा रोजगारातील मोठा घटक आहे. त्यामुळे त्यांना सामावून घेण्याबाबत सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या सोबतच त्यांनी सवलतींच्या मुद्द्यालाही स्पर्ष केला. वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यासंबंधी निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी फडणवीसांनी केली आहे.

Exit mobile version