गृहमंत्र्यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांनांतर मुख्यमंत्री क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता

गृहमंत्र्यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांनांतर मुख्यमंत्री क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणी रॅकेट चालवण्याचे आरोप झाल्यनंतर ठाकरे सरकारवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. पण अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र स्वतःला क्वॉरेन्टाईन करून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा खळबळजनक दावा केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ह्याला वसुलीचे काम दिल्याचे या पत्रात म्हटले आहे. या पत्रानंतर ठाकरे सरकार पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी अजुनपर्यंत काही प्रतिक्रिया दिली नसली तरीही मुख्यमंत्री ठाकरे हे क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता आहे. याला कारण मुख्यमंत्र्याचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असणार आहेत.

हे ही वाचा:

पोलिस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप करणे ही अभूतपूर्व घटना – देवेंद्र फडणवीस

दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ

मुख्यमंत्र्यांनी आता १०० कोटींच्या वसुलीचा खुलासा करावा

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना शनिवारी कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे. “मला कोरोनाची काही सौम्य लक्षणे आढळली म्हणून मी चाचणी कारून घेतली त्यात मी कोरोना पॉसिटीव्ह आलो आहे.” असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे

आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचे कुटुंब क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एकीकडे राज्यात एवढी राजकीय खळबळ सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र क्वॉरेन्टाईन होऊ शकतात. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील ट्विट करत ही शक्यता वर्तवली आहे. पण तरीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष्य लागलेले आहे.

 

Exit mobile version