सतत खोटारडी टीका केल्यावर फोन कोणत्या तोंडाने करायचा?

सतत खोटारडी टीका केल्यावर फोन कोणत्या तोंडाने करायचा?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. यावरूनच भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ज्यांच्यावर सतत खोटारडी टीका करतो त्यांना फोन कुठल्या तोंडाने करायचा? असे म्हणत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. वास्तविक राज्यातील कोविडची परिस्थिती बिकट असताना मुख्यमंत्री फोन अथवा ईमेल सारख्या आधुनिक आणि जलद माध्यमातून पंतप्रधानांशी संवाद साधू शकले असते. पण त्यांनी हे न करता पंतप्रधानांना पत्र पाठवले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कोरोना काळात शक्य ती मदत केलेली असतानाही राज्यातील मंत्र्यांकडून सतत केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडली जात असतात. यावरूनच भातखळकरांनी ठाकरे सरकारला चपराक लगावली आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

मेडिकलची परीक्षा पुढे ढकलली, काय आहेत नव्या तारखा?

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

गुरुवार १५ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महाराष्ट्रासाठी काही मागण्या केल्या आहेत. मंगळवारी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि लॉकडाऊन जाहिर केला, तेव्हा आपण पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणार आहोत असे त्यांनी जाहीर केले होते. गरज पडली तर पंतप्रधानांना फोनही करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे आपल्या आमदारकीचा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा असा फोन मुख्यमंत्र्यांनी केला होता. पण आता कोरोनाच्या अडचणीच्या काळात त्यांनी पंतप्रधानांशी थेट न बोलता पत्र लिहून औपचारिक पद्धतीने संवाद साधला आणि सरकारी लालफितीच्या कारभाराचे उदाहरण जनतेसमोर ठेवले.

Exit mobile version