26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमुख्यमंत्र्यांनी 'माझे राज्य, माझी जबाबदारी' म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधताना त्यांनी ठाकरे सरकारची चांगलीच खरडपट्टी केली आहे. ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी कर्तव्यपूर्ती करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार ही परिस्थिती हाताळण्यात पुरते अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर या सगळ्याचाच तुटवडा आहे. अशा परिस्थिती ठाकरे सरकारमधलील मंत्री आणि नेते आल्या दिवशी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडून शिमगा करत असतात. पण अखेर सत्य समोर आल्यावर त्यांना तोंडावर पडायचीच वेळ येते.

हे ही वाचा:

मलिकांची ट्विट्स म्हणजे अर्धसत्य आणि असत्य

कोरोना लसीवर असलेली बौद्धिक संपदेची कलमे शिथिल करा

बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना

नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलतात का?

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी अशाच प्रकारे ठकरे सरकारवार हल्ला चढवला. ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारची सुरु असलेली नौटंकी बघून खूपच वाईट वाटले असे गोयल यांनी म्हटले आहे. भारतात सध्या क्षमतेपेक्षा ११०% जास्त ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. त्यासोबतच औद्योगिक वापरातील ऑक्सिजनही वैद्यकीय वापराकडे वळवण्यात आला आहे. यापैकी महाराष्ट्राला ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा केंद्र सरकारतर्फे केला जात आहे. काल माननीय पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की अशा संकटाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित काम केले पाहिजे असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून खेळले जाणारे घाणेरडे राजकारण बघितल्यावर धक्का बसतो आणि दुःख होते. महाराष्ट्र सध्या भ्रष्ट्राचारी आणि अयोग्य सरकार सहन करतोय. महाराष्ट्राची जनता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ पाळत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनीही ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करण्याची गरज आहे.” अशी सणसणीत चपराक पियुष गोयल यांनी लगावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा