मुख्यमंत्र्यांनी मेंदू तपासून घ्यावा

मुख्यमंत्र्यांनी मेंदू तपासून घ्यावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यानी राज्यात मागल्या दाराने लॉकडाऊन जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन असा थेट उच्चार न करता राज्यात संचारबंदी म्हणता म्हणता लॉकडाऊन लावलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर ठाकरे सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका होत आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस असे काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल, अशी अपेक्षा असताना फुटकळ आश्वासनांपलिकडे फारसे काही पदरी पडले नाही. एकीकडे महाराष्ट्रातील सुविधा अपुऱ्या आहेत, अशी नेहमीची तक्रार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागण्यांच्या यादीवरच मुख्यमंत्र्यांनी भर दिला. एकूणच आतापर्यंतच्या फेसबुक लाईव्हमध्ये झालेला केंद्राकडे बोट दाखविण्याचा कार्यक्रमच यावेळीही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे दिसले. आपल्याकडे तूर्तास कोणतीही ठोस उपाययोजना नाही, असाच या भाषणाचा सूर होता. संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होईल, अशी शक्यता होती, पण तशी स्पष्ट घोषणा न करता मागल्या दाराने लॉकडाऊन करण्याची पळवाट शोधण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

पुढील पंधरा दिवस काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर

फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सर्व घटकांचा विचार केलेला नाही

चेक द ब्रेन
उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ असे घोषवाक्य देत आपला कोविड विरोधी कार्यक्रम सुरु ठेवला आहे. याच नावाचा आधार घेत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ‘ब्रेक द चेन’ नव्हे तर ‘चेक द ब्रेन’ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी जास्त योग्य आहे असा जोरदार चिमटा नितेश राणे यांनी सरकारला काढला आहे.

Exit mobile version