महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी

भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी आहेत. तर अनिल परब हे सेवाभावी आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारने लागू केलेल्या संचारबंदीवर टीका केली आहे. संचारबंदीच्या निर्णयाने राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचं पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचं पोट कसं भरणार? राज्यातील कामगार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचं पाप आणि अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. दुकाने बंद करायची तर जीएसटी का आकारली जातेय? दुकानदारांना नोटीस का पाठवत आहात? असा सवाल त्यांनी केला.

अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करण्याचं आणि आणून द्यायचं काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठून नेऊन पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. दीड हजार घ्या, पाचशे घ्या. शंभर घेऊन जा. हे काय आहे? चेष्टा आहे लोकांची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा असू शकतो? रडत लक्ष्मी. अशी टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा:

पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे- सरन्यायाधीश शरद बोबडे

चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, अनिल देशमुख प्रकरणी पडळकरांची टीका

माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना

राज्य आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता? असा सवाल करतानाच माणसं मरत आहेत. साठ हजार लोकं मेले आहेत. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. दीड हजार रुपये जाहीर करण्याचं काम क्लार्कचं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता? असा सवालही त्यांनी केला.

Exit mobile version