महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ फेब्रुवारी) जनतेला संबोधित केलं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष होतं. मुख्यमंत्री कदाचित लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शंका आणि भिती अनेकांना होती. परंतु आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे धडधडीत खोटं बोलल्याचं समोर आलं आहे.
भारतीय माध्यमांमधून दक्षिण आफ्रिकेने सिरम इन्स्टीट्युटच्या लसी परत पाठवल्याची बातमी असताना या बाबतचा फोलपणा समोर आला आहे. आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतःचा भारताच्या लसी परत पाठवत नसल्याचे सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री डॉ. झ्वेली मखिझे यांनी सांगितले की, मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही भारताच्या लसी परत पाठवलेल्या नाहीत. आम्ही ऍस्ट्राझेनेका लसी भारताला परत केलेल्या नाहीत.
हे ही वाचा:
दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी भारतीय लसीबाबतचा अपप्रचार केला उघड
याबाबत आणखी खुलासा करताना ते हे देखील म्हणाले, की या लसींची अंतिम मुदतीची दिनांक उलटून गेलेली नाही. आमच्या गुणवत्ता चाचणी नंतरच ३१ एप्रिल ही दिनांक निश्चित करण्यात आली होती. या लसींची अंतिम मुदत उलट गेली असल्याची चुकीची बातमी पसरवली गेली.
दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी एवढी स्पष्ट माहिती देऊन देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर खोटे विधान केले आहे. “आफ्रिकेने आपली लस परत पाठवली असली तरी ‘ती लास काही ही नाही’, आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो.” असे विधान उद्धव ठाकरेंनी आज केले.
मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं. आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते सफेद झूठ आहे. आफ्रिकेकडून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा @OfficeofUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 21, 2021
मुख्यमंत्र्यांच्या या खोट्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी, “मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं. आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते सफेद झूठ आहे. आफ्रिकेकडून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.