अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही, अशा शब्दात भाजपा नेते नीलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला. महाराष्ट्राची वाट लावू नका, असा इशाराही नीलेश राणेंनी दिला.
अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 29, 2021
“अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.” असे ट्वीट नीलेश राणे यांनी केले आहे.
हे ही वाचा:
पोटदुखीमुळे शरद पवार रुग्णालयात
बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंदूंवर अत्याचार
कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ
ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत राज्यात होळीचा उत्साह
रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड टास्क फोर्स आणि राज्याचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत त्याविषयी चिंता व्यक्त केली. राज्यातील जनता नियम पाळत नसून यामुळेच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केले. हे असेच चालू राहिले तर राज्यात लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध आणावे लागतील असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. त्यामुळे त्यासाठीचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.