भारतीय जनता पक्षाची ठरवलेली आणि अपेक्षित अपेक्षित नेत्यांची कोअर कमिटीची बैठक आज सुरू आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व कोअर कमिटीचे सदस्य आज राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि संघटनेच्या अति महत्त्वाच्या बाबींवर आज चर्चा करणार आहेत.
एकीकडे राज्यातील सरकारचे महत्वाचे नेते कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील महत्वाच्या महापालिकांच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. या निवडनुका म्हणजे मिनी विधानसभा असल्याचेच म्हटले जात आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे. नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडत आहे.
हे ही वाचा:
श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’
नवाब मलिकांचा मुलगा फराझला लवकरच ईडीकडून समन्स
युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत; पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सल्ला
या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासह इतरही महत्वाचे नेते उपस्थित आहेत. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकी विषयी माहिती दिली. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे. तर ७ मार्च नंतर महाराष्ट्रात सत्ताबदल होण्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असल्यामुळे या बैठकीला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.