‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित

‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा दिवसही चांगलाच गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृहातील भाषणाचा विरोधी पक्षाकडून चांगलाच समाचार घेतला गेला. यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्राचा कोविड’ नावाची एक पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे मुंबई सरचिटणीस आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून ही पुस्तिका साकारली गेली आहे.

कोविड परिस्थितीचा फायदा घेत महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून आजवर अनेकदा करण्यात आला आहे. त्याचाच पर्दाफाश या पुस्तिकेतून करण्यात आला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे देखील उपस्थित होते.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री ठाकरेंची ‘राहुल गांधीगिरी’

“कोविडच्या काळात मुंबई मध्ये जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला, त्या सर्व घटनांचे संकलन करून आमदार अमित साटम यांनी ही पुस्तिका तयार केली आहे. आम्ही ही पुस्तिका मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून पाठवणार आहोत. कोरोनाच्या नावाने कोणी आपला चांगभलं करून घेतलं हे मुंबईकरांना कळेल.”असं देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तिकेचे प्रकाशन करताना सांगितले.

“कोवीडच्या लाटेत महाराष्ट्राचे हाल होत होते. जनता भरडली जात होती. पण अशावेळी राज्यकर्ते मात्र टक्केवारीचा मलिदा खाण्यात मश्गुल होते. पीपीई किट्स, थर्मामीटर, ऑक्सिमीटर इथपासून ते डेड बॉडी बॅग्स, ऑक्सिजन सिलेंडर अशा सर्वच गोष्टींच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न या पुस्तिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पण ही केवळ छोटीशी झलक असून अजून खोदकाम बाकी आहे.” अशी प्रतिक्रिया आमदार अमित साटम यांनी ‘न्युज डंकाशी’ बोलताना दिली.

Exit mobile version