अजब प्रकार! उत्तर प्रदेशातल्या घटनेवरून महाराष्ट्रात बंद

अजब प्रकार! उत्तर प्रदेशातल्या घटनेवरून महाराष्ट्रात बंद

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेले घृणास्पद बलात्कार आणि हत्या, पुराचे थैमान, वादळामुळे झालेली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था, मदतीसाठी टाहो फोडणारे शेतकरी अशा सगळ्या परिस्थितीतही सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने मात्र उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युच्या निमित्ताने महाराष्ट्र बंद करण्याची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र एकदिवसासाठी बंद करण्याची घोषणा महाविकास आघाडीने केली असून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेस आणि शिवसेना त्यात सामील होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्या पक्षांशीही चर्चा करण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात एवढ्या गंभीर घटना घडत असताना त्याबद्दल कोणतीही चिंता व्यक्त न करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने थेट उत्तर प्रदेशातील घटनेबद्दल महाराष्ट्रात बंद करण्याचे कारण काय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

 

हे ही वाचा:

नाट्यगृहांच्या सुरक्षेसाठी पालिकेचे नवे ‘खासगी’ नाटक

जलसंपदा खात्यातील पाण्यासारखा वाहणाऱ्या पैशाला अडवणार!

व्वा रे व्वा! गरब्याला नियमांच्या साखळ्या घालून विचारांचे सोने मात्र लुटणार

मंदिरे तर उघडणार; पण प्रसाद, फुलांवर फुली

 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, हे दाखविणाऱ्या असंख्य घटना घडल्या पण सरकारने त्याबद्दल गांभीर्य दाखविले नाही. शिवाय, या घटनांबद्दल कधी उत्तर प्रदेश एक दिवस बंद असल्याचेही चित्र दिसलेले नाही. मात्र महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमधील घटनेवरून बंद करण्यात येत असल्याने हे काही विचित्रच घडत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

 

Exit mobile version