30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणआजचा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद

आजचा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद

Google News Follow

Related

महाराष्ट्रात ठाकरे सरकारने पुकारलेला आजचा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकारने पोलीस, जीएसटी आणि सेल्स टॅक्स अधिकारी यांना हाताशी धरून विविध घटकांना धमकावून बंद पाळण्यास भाग पडले आहे असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे. सोमवार ११ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन फडणविसांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

आजच्या महाराष्ट्र बंदमुळे ठाकरे सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर आला आहे. लखीमपूर खेर मध्ये घडलेल्या घटने करता महाराष्ट्रामध्ये बंद पुकारला जातो. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदतही केली जात नाही. मदत केली गेली तर ती ही तुटपुंजी केली जाते असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातल्या दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने बांधावर जाऊन मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या. पंचवीस हजार आणि पन्नास हजार मदतीच्या घोषणा हवेत विरल्या. कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या. इतर मदतीच्या घोषणा हवेत विरल्या. नैसर्गिक आपत्ती आली तरी शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. दिली तर इतकी तुटपुंजी मदत दिली गेली की या सरकारमधील घटक पक्षांनीच टीका केली. ‘भाजपा सरकारे बरे होते. मदत करायचे. अन ज्या सरकारला आम्ही मदत करतो ते शेतकऱ्याला मदत करत नाही’ असे या सरकार मधील घटक पक्ष म्हणून लागले. त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे.

आजचा बंद हा राजकीय पोळी भाजायला
हे तेच लोक आहेत ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा या गोळीबार करणाऱ्या लोकांना हा बंद करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. लखीमपूरची घटना गंभीर आहे. स्थानिक सरकार यावर कायदेशीर मार्गाने योग्य ती कारवाई करत आहे. पण आजचा बंद हा त्या घटनेविषयी संवेदना दाखवणाऱ्या नसून त्या घटनेच्या आधारे राजकीय पोळी भाजणे करता संकुचित मनोवृत्तीने केलेला बंद आहे.

हे ही वाचा:

‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’

बंद यशस्वी करण्यासाठी मविआची जोर जबरदस्ती

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

अनिल देशमुखांच्या मुलाला होणार अटक?

पोलिसांची बघ्याची भूमिका
नागरिकांचा या बंदला पाठिंबा नाही. पण यंत्रणांचा गैरवापर करून यामध्ये पोलिस यंत्रणा, सेल्स टॅक्स जीएसटी यांच्या माध्यमातून नागरिकांवर दडपशाही करण्यात येत आहे. लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केले जात आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर मोजून दहा कार्यकर्ते जाळपोळ करून संपूर्ण द्रुतगतीमार्ग रोखतात. पोलिस तमाशा बघत बसतात. पोलिस कुठलीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्यासारखा हा बंद सुरू आहे हे यातून स्पष्टपणे दिसून येते

महाराष्ट्राचे सरकार हे बंद सरकार
खरं तर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे बंद सरकार आहे. हे सत्तेत आल्यावर त्यांनी जनहिताच्या अनेक योजना बंद केल्या, शेतकऱ्यांची अनुदाने बंद केली. कोरोना काळात जेव्हा संपूर्ण देश सुरू होता. तेव्हा महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे व्यापारी, फुटपाथवरील दुकानदार, छोटे व्यवसायिक यांचे गाडे रुळावर येऊ लागले आहे. तर सरकारने बंद पुकारला आणि दमदाटी करून धमक्या देऊन हा बंद केला जातोय.

थोडी जरी नैतिकता असले तर पॅकेज जाहीर करा
या सरकारला थोडीजरी नैतिकता असेल तर हा बंद संपायच्या आधी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसे नाही झाले तर या सरकारचा ढोंगीपणा अगोदर उघड झालाच आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणात उघड होईल असे फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा