हिवाळी अधिवेशनात विधानसभेला मिळणार नवे अध्यक्ष महोदय?

हिवाळी अधिवेशनात विधानसभेला मिळणार नवे अध्यक्ष महोदय?

आज पासून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी तर्फे याची संपूर्ण तयारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षाचे बारा आमदार निलंबित असल्याच्या फायदा उठवून अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्षच नाहीत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले त्यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. पण त्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी ते विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार झाले. तेव्हापासून महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष पद रिक्त आहे.

तर आता या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड पार पडावी यासाठी रणनिती आखली जात आहे. महा विकास आघाडीच्या सत्ता समीकरणानुसार विधानसभा अध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाचा दावा आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदासाठी दिल्लीत खलबतं पार पडली आहेत. त्यासाठी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुनील केदार अशी काही ठराविक मंडळी दिल्ली दरबारी गेली होती.

हे ही वाचा:

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजपासून श्रीगणेशा

जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात

… म्हणून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू रवींद्र वायकरांची ईडीकडून ८ तास चौकशी

नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पडते. पण ठाकरे सरकारने यात बदल करत आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्ष नेमण्याचा घाट घातला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले असून सरकारला आपली मते फुटण्याची भीती वाटते असा आरोप विरोधी पक्ष करताना दिसत आहे.

नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पडते पण ठाकरे सरकारने यात बदल करत आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्ष नेमण्याचा घाट घातला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले असून सरकारला आपली मते फुटण्याची भीती वाटते असा आरोप विरोधी पक्ष करताना दिसत आहे.

Exit mobile version