शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला. त्यामुळे आता विधानसभेला अध्यक्ष मिळणार आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्रत्यक्ष मतदाना ऐवजी आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला असून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून तीन नावे आहेत. विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. राऊत यांना त्यांचे ऊर्जा खाते सोडायचे नाही. तर अशोक चव्हाण यांनाही अध्यक्षपदामध्ये फारसा रस नसल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
काय म्हणता, आता टीव्हीमधून पदार्थांची चव घेता येणार?
आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो
चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी
ओमिक्रोन विरुद्धच्या लढाईसाठी मोदींची ‘पंचसूत्री’
गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ नितीन राऊतही दिल्लीत होते. विधानसभा अध्यक्षपदाबद्दल चर्चा करण्यासाठी हे नेते दिल्लीत गेले होते, अशी चर्चा होती. विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष झाले होते. मात्र, मध्यंतरी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे.