विधानसभेला कधी मिळणार ‘अध्यक्ष महोदय….’?

विधानसभेला कधी मिळणार ‘अध्यक्ष महोदय….’?

महाराष्ट्राची विधानसभा ही सद्ध्या अध्यक्षावीना आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि राज्याच्या विधानसभेतील समीकरणे बदलली. तेव्हापासून आजतागायत नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. यामागे महाविकास आघाडी सरकारला आपले आमदार फुटून विरोधी पक्षासोबत जाण्याची भीती असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच ठाकरे सरकार मार्फत अध्यक्षपदाची निवडणूक ही या ना त्या कारणाने पुढे ढकलली जात असल्याचा आरोप विरोधक करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन हे आता लवकरच येऊ घातले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा अध्यक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहे. या आधी ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन गुंडाळले. यावेळी अपुऱ्या वेळेचे कारण देत ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पहिले होते.

हे ही वाचा:

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

धक्कादायक! महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू!

भाडेवाढीतून एसटीला मिळणार इतके कोटी

आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट

तर आगामी हिवाळी अधिवेशनात देखील अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल केल्यानंतरच ही निवडणूक घेतली जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती ऐवजी हात उंचावून मतदान करण्याचा कायदा ठाकरे सरकार आणण्याच्या तयारीत आहे. विधान परिषदेत हा कायदा पारित झाल्यानंतरच राज्यातील अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल असे सांगितले जात आहे. पण या सर्व विरोधकांकडून मात्र तीव्र विरोध दर्शवला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेला नवीन अध्यक्ष केव्हा मिळणार आणि ते कोण असणार? याची चर्चा रंगताना दिसत आहे.

Exit mobile version