भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालरोग तज्ञांसोबतच्या बैठकीतला व्हिडिओ शेअर करताना ‘मी काहीच करत नाहीये’ याची प्रामाणिक कबुली मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
देशात कोविडचा उद्रेक सुरू आहे. दुसऱ्या लाटेत महामारीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. या सगळ्या कोविड काळात पहिल्यापासूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते घरात बसून असल्याचा आरोप होत असतो. मुख्यमंत्री या कठीण परिस्थितीतही राज्याला वाऱ्यावर सोडून आपल्या घरात बसून असतात अशी टीका त्यांच्यावर कायम होताना दिसते. या टीकेवरूनच आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.
हे ही वाचा:
अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला
अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट
चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक
एफकॉन्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
मुख्यमंत्र्यांनी रविवार, २३ मे रोजी राज्यातील बाल रोग तज्ञांशी संवाद साधला. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री असे म्हणाले की माझ्यावर अनेकदा टीका होते की मी घरी बसलेलो आहे. तर हो, मी घरीच बसलो आहे. हाच धागा पकडून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ शेअर करताना मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक कबुली दिल्याचा सणसणीत टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
अखेर मुख्यमंत्री @OfficeofUT यांची प्रामाणिक कबूली…
मी काहीही करत नाहीये…
मी निमित्त मात्र…
होय मी घरीच बसलोय… pic.twitter.com/u6obkwPXf2— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 23, 2021