बारामतीमध्ये ‘महा रोजगार मेळावा’ संपन्न झाला असून शरद पवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या मैदानात हा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. याशिवाय शरद पवार आणि सुप्रिया सुळेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे राजीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने या काही काळ नाराजी नाट्य रंगले होते. अशातच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे स्वागत करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज मंचावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येताच, सुप्रिया सुळे या त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे झाल्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे हात जोडून स्वागत केले. पण तेवढ्यात शिंदे यांच्या मागे असलेल्या अजित पवार यांनी जनतेकडे हात दाखवून अभिवादन करण्यास सुरुवात केली आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या आणि त्यांचेही त्यांनी स्वागत केले. दरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी नजरा-नजर करणे टाळले.
सुप्रिया सुळे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशीही बातचीत केली. यावेळी त्यांच्याशेजारीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. मात्र, दोघींनीही मंचावर एकमेकांशी बोलणे टाळले. दरम्यान शरद पवारेदेखील मंचावर येत असताना त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी नजरा-नजर करण्याचे टाळले. शरद पवार मंचावर आले आणि तडक आपल्या जागेवर जाऊन बसले. सुप्रिया सुळे यांनी मात्र दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
हे ही वाचा:
केसीआरला धक्का! दोन दिवसात दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!
देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज ३,५१६ कोटींची भर
युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!
राष्ट्रवादी पक्ष सध्या अजित पवार यांच्याकडे असून पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार यांना नवे चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने असताना शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली होती.