योगींचा धडाका, गुंतवणुकीचे लक्ष्य दोन वर्षे आधीच गाठले

योगींचा धडाका, गुंतवणुकीचे लक्ष्य दोन वर्षे आधीच गाठले

उत्तरप्रदेशात उद्योगधंदे वाढावेत यासाठी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या सरकारने २०१७ मध्ये पाच वर्षात वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणुक आणि तीन लाख नोकऱ्यांची घोषणा केली होती. अवघ्या तीन वर्षात त्यांनी हा टप्पा गाठण्यात यश मिळवले आहे.

राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री योगींनी महत्वपूर्ण पावले उचलली. त्यामुळे कोविड-१९ च्या काळातसुद्धा राज्यात दक्षिण कोरिआ, तैवान आणि चीनकडून गुंतवणूक झाली. ” आम्ही २०२२ पर्यंत वीस हजार कोटींची गुंतवणूक आणि तीन लाख नोकऱ्यांचे लक्ष्य ठेवले होते पण आम्ही ते दोन वर्ष आधीच पूर्ण केले आहे. त्याशिवाय जवळपास ३० गुंतवणूकदार राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत.” अशी माहिती उत्तरप्रदेश सरकारचे उद्योग आणि औद्योगिक पायाभूत सुविधा, आलोक टंडन यांनी दिली.

नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेस-वे परीसरात सर्वाधिक गुंतवणूक होऊन, इथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीचे क्लस्टर विकसित करण्यात आले आहे. याच भागात दक्षिण कोरिआच्या सॅमसंगने जगातला सगळ्यात मोठा मोबाईलचा कारखाना सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, इलेक्ट्रिक उपकरणनिर्मितीचे क्लस्टरही या भागात विकसीत केले जात आहे. या केंद्रात तीन भारतीय, चार तैवानी कंपन्यांसह आणि ओप्पो ही चीनी कंपनी गुंतवणूक करणार आहे. यातून अतिरिक्त २००० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.

Exit mobile version