आता मध्य प्रदेशातही लसीकरण मोफत

आता मध्य प्रदेशातही लसीकरण मोफत

शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील मध्य प्रदेश दरकारने लसीकरण संदर्भातील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून देशातील १८ वर्षांच्या पुढील सर्वच नागरिक लसीकरणासाठी पात्र असल्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने या संदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. १ मे पासून मध्य प्रदेशमधील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण हे मोफत होणार आहे.

देशभरात सध्या एकीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तर दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. आजवरचा देशाचा लसीकरणाचा आकडा १२,९६,४६,१०५ इतका आहे. देशात सध्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लसीकरण अधीक जलद गतीने होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशात आता परदेशी लसींनाही परवानगी दिली जाणार आहे. तर १ मे पासून देशातील सर्वच प्रौढ नागरिक अर्थात १८ वर्षांवरील नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. अशातच आता मध्य प्रदेश सरकारने राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण निःशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांनी प्रियांकांना झापले!

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

राज्याचा आरोग्यमंत्री इतका असंवेदनशील कसा असू शकतो?

लॉकडाउनचे आणखी कडक निर्बंध

बुधवारी मध्य प्रदेश सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सीएमओ मध्य प्रदेशच्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे बोलताना दिसत आहेत. १ मे पासून मध्य प्रदेशमधील १८ वर्षांच्या वरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे आणि सर्वांसाठी हे लसीकरण मोफत असणार आहे असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जाहीर करताना दिसत आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे राज्याच्या जनतेकडून स्वागत केले जात आहे. मध्य प्रदेशच्या आधी उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांमध्ये नागरिकांसाठी मोफत लसीकरण उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version