ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दमणहून रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरात का लपून बसले आहेत, असा घणाघाती सवाल भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी ठाकरे सरकारला केला आहे. रेमडेसिवीर प्रकरणावरून सध्या राज्यात राजकारण पेटलेले असताना महाविकास आघाडीकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मात्र त्यासाठी कोणतेही पुरावे देण्याचे धाडस हे सरकार करत नाही. त्यावरूनच भांडारी यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे कधी देणार, असे म्हणत त्यांनी या सरकारला जाब विचारला आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

कुंभ मेळा असो की रमजान कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही

कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर

ब्रुक्स फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर आदिंनी पोलिसांना जाब विचारला होता. त्यामुळे ठाकरे सरकार बिथरले.

भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी त्यासंदर्भातच विचारलेले रोखठोक प्रश्न असे-

Exit mobile version