26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दमणहून रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरात का लपून बसले आहेत, असा घणाघाती सवाल भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी ठाकरे सरकारला केला आहे. रेमडेसिवीर प्रकरणावरून सध्या राज्यात राजकारण पेटलेले असताना महाविकास आघाडीकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मात्र त्यासाठी कोणतेही पुरावे देण्याचे धाडस हे सरकार करत नाही. त्यावरूनच भांडारी यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे कधी देणार, असे म्हणत त्यांनी या सरकारला जाब विचारला आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

कुंभ मेळा असो की रमजान कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही

कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर

ब्रुक्स फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर आदिंनी पोलिसांना जाब विचारला होता. त्यामुळे ठाकरे सरकार बिथरले.

भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी त्यासंदर्भातच विचारलेले रोखठोक प्रश्न असे-

  • काल ज्या रेमडेसिवीर सप्लायरला पकडलं त्याला का सोडून द्यावं लागलं?
  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दमणला जाऊन रेमडेसिवीर उपलब्ध करत आहेत तर मुख्यमंत्री घरी का लपले आहेत?
  • जो दमणचा सप्लायर असून महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिवीर द्यायला तयार आहे त्याला ११ पोलीस पाठवून उचलून का आणलं? तो महाराष्ट्राला मदत करत आहे तर अतिरेक्यासारखी वागणुक देताना लाज वाटली नाही?
  • सगळ्या परवानग्या दमण आणि महाराष्ट्र शासनाकडून सप्लायरने खास महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरची व्यवस्था करण्यासाठी घेतल्या. मग अटक का ?
  • डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा यांचा OSD त्या सप्लायरला फोन करून धमक्या का देत होता ? तुम्ही स्वतः किंवा राज्य सरकार ह्या कंपन्यांशी चर्चा का करत नाही ?
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा