मढमधील ‘ते’ स्टुडिओ पाडण्यास सुरुवात झाल्याची सोमय्यांची माहिती

४९ स्टुडिओंच्या बांधकामप्रकरणी आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्यावर झाले होते आरोप

मढमधील ‘ते’ स्टुडिओ पाडण्यास सुरुवात झाल्याची सोमय्यांची माहिती

मढ, मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम आता सुरू झाले आहे, असे ट्विट भाजपाचे नेते किरीट सोमय्या यानी ट्विट करत दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे स्टुडिओ आम्ही तोडून टाकू. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण गेले अनेक दिवस लावून धरले आहे. यात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालिन पालकमंत्री तसेच मत्स्य उत्पादन मंत्री अस्लम शेख यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केले आहेत. यांच्या कृपेने १००० कोटींचे हे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे.

ही कारवाई मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झाली आहे. सीआरझेड क्षेत्रात कोणतीही परवानगी न घेता हे स्टुडिओचे करण्यात आलेले काम पक्के करण्याचा डाव असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे होते. मुंबई महानगरपालिकेने संबंधित स्टुडिओला तात्पुरती परवानगी गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ला दिली होती. त्याची मुदतही २०२२ला संपली. शिवाय, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हे बांधकाम तोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

हे ही वाचा:

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

महाविकास आघाडीने नेमलेले शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

गुद्दे मारा, शाबासकी मिळवा !

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे ताटातले वाटीत

 

किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की, या ४९ स्टुडिओंच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप होता. बनावट कागदपत्रे सादर करून हजारो चौरस मीटर जागेवर हे स्टुडिओ उभारण्यात आल्याचे सोमय्यांचे आरोप आहेत.

Exit mobile version